अतिक अहमद ने त्याच्या हत्येपूर्वीच सुप्रीम कोर्टाला लिहिलं होतं एक गोपनीय पत्र ‘जर माझी हत्या झाली तर’…

0
39

अतिक अहमद ने त्याच्या हत्येपूर्वीच सुप्रीम कोर्टाला लिहिलं होतं एक गोपनीय पत्र ‘जर माझी हत्या झाली तर’… 

New Delhi : उत्तर प्रदेश मधील गॅंगस्टरचा राजकारणी बनलेला माजी खासदार अतिक अहमद याची नुकतेच हत्या, काही गुन्हेगाराकडून करण्यात आली. पण आपल्या जीवाला धोका आहे याची अतिकला पहिल्यापासून खूप भीती होती. सुप्रीम कोर्टाला हत्ये पूर्वीच त्याने एक गोपनीय पत्र लिहून ठेवलं होतं. जर मला ठार करण्यात आल तर हे पत्र कोर्टाला पाठवून द्याव अशी विनंती अतिकने आपल्या वकीलाला केली होती. ते पत्र आता समोर आले आहे.

अतिकच्या वकीलाने सांगितले की, त्याला तुरुंगातच जीवे मारण्याची धमकी काही पोलिस अधिकाऱ्यांनी दिली होती. त्याबद्दल सर्व सविस्तर गोष्टी या पत्रात आहेत. वकीलाने असेही सांगितले की, २६ मार्च रोजी गुजरातच्या सांबरमतीे तुरुंगातून अतिकला उत्तर प्रदेशात नेताना त्यांने हत्या हत्या असे पत्रकारांकडे बघत म्हटले होते. अतिकला आपला एन्काऊंटर होईल अशी भीती वाटत होती. अतिकने या विरोधात एक याचिका देखील सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

दरम्यान, अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद हे उमेश पालच्या हत्येचे मास्टरमाईंड, यांना शनिवारी मेडिकल चेकअपसाठी प्रयागराज ला घेऊन जात असताना काही अज्ञातांनी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अतिकचा दुसरा मुलगा असद याचा दोन दिवसांपूर्वीच युपी पोलिसांनी एन्काउंटर केला होता.