अदानी समूहावरील कर्जात २१ टक्क्यांची वाढ १ वर्षात झाली!!

0
61

अदानी समूहावरील कर्जात २१ टक्क्यांची वाढ १ वर्षात झाली!!

अदानी ग्रुप : जानेवारीपासून उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी वाढत आहेत. अदानी समूहाचे शेअर्स हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्ट नंतर घसरले होते. तसेच समूहावरील कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढत आहेत. अदानी समूहावरील असलेल्या कर्जात सुमारे २१ टक्क्यांची वाढ गेल्या वर्षभरात झाली, असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडियामध्ये अदानी समूहाच्या सध्याच्या आर्थिक स्थिती बाबतच्या अनेक बातम्या येत आहेत. त्यापैकीच ‘ब्लूमबर्ग’ या एजन्सीच्या अहवालानुसार, अदानी समूहावरील कर्जात २० टक्क्यांची वाढ झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. नवीन कागदपत्रांच्या आधारे ब्लूमबर्ग ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, विदेशी बँकांचा अदानी समूहाच्या कर्जात मोठा वाटा आहे. 

विदेशी बँकांचा वाटा ऐकून कर्जाच्या एक तृतीयांश झाला आहे. गुंतवणूकदारांना समूहाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण कर्जाच्या २९ टक्के कर्ज हे जागतिक आंतरराष्ट्रीय बँकेकडून घेण्यात आले आहे. कंपनी कर्जाच्या संबंधात हे आकडे मार्च अखेर पर्यंतचे आहेत. अदानी समूहाच्या कर्ज पोर्टफोलिओ मध्ये सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बँकांची नावे नव्हती. या कागदपत्रांवरून उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाची आर्थिक परिस्थिती कशी बदलली हे दिसून येते. अदानी समूहाची प्रगती देशी-विदेशी बँकांचा समावेश कर्जदारांमध्ये असल्याने किती आरामात झाली आहे. अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. अहवालात म्हटल्यानुसार जागतिक पातळीवरचा अदानी समूह असल्याने त्यांच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय बाजाराची कायम नजर असते. यामुळेच अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने हा अहवाल प्रदर्शित केला आहे. काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी अदानी समूहावर फसव्या व्यवहारांचा आणि वीस हजार कोटी रुपयांच्या बनावट व्यवहारांसंबधी आरोप केले होते. त्यामुळे तेव्हा राजकारण चांगलेच तापले होते.