उष्णतेची लाट सतर्क ! महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याला सतर्कतेचा इशारा, राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा ४० पार 

0
81

उष्णतेची लाट सतर्क ! महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याला सतर्कतेचा इशारा, राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा ४० पार 

Mumbai: मुंबईत १३ भाविकांचा २ ते ३ दिवसांपूर्वी आयोजित एका कार्यक्रमात उष्माघाताने मृत्यू झाला. शिवाय राज्यभरात देखील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला आता हवामान विभागाने अलर्ट जारी करुन सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

अलर्ट मध्ये म्हटले आहे की, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णता सदृश लाटेची स्थिती आहे. उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. 

यानुसार पुणे, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, रायगड, ठाणे, नांदेड, लातूर, हिंगोली, भंडारा, अमरावती, धुळे, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. 

त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शारीरिक कष्टाची कामे टाळावीत, घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान खात्यामार्फत करण्यात आले आहे.