कांद्याला भाव न मिळाल्याने परत आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; कांदा कवडीमोल भावाने विकावा लागतोय.!!

0
73

कांद्याला भाव न मिळाल्याने परत आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; कांदा कवडीमोल भावाने विकावा लागतोय.

भारतात कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत. यामागील सर्वात मोठे कारण आहे अवकाळी पाऊस. देशात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतात कांद्याचे दर ५ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहचले आहेत. महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन देशातील एकूण उत्पादनाच्या ४० % होते. अनेक ठिकाणी मार्च महिन्यात पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. 

कांद्याच्या गुणवत्तेची चिंता शेतकऱ्यांमध्ये वाढली असून, ते घाबरून प्रत्यक्ष किमतीपेक्षा पडत्या दराने कांद्याची विक्री करत आहेत. लवकरात लवकर कांदा विकण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी हे एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचत आहेत, असे तज्ञांचे मत आहे. बाजारात कांदा आवक अचानक वाढल्याने, कांद्याचे भाव कमालीचे घसरले आहेत. यासोबतच निकृष्ट दर्जाचा कांदा शेतकऱ्यांनी ४-६ महिने साठवून ठेवल्यास कांद्याला पंधरा रुपये प्रति किलो दराचा तोटा सहन करावा लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसू शकतो. 

लाईव्ह मिंट च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, २४ हजार टन कांदा शेतकरी नाशिकच्या मंडईत दररोज आणत आहेत. ७० टक्के कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. रब्बी कांदा पिकाची काढणी मार्च ते मे या कालावधीत केली जाते. सध्या कांद्याला बाजारात २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल भाव आहे. तसेच उत्तम प्रत असलेल्या कांद्याला ५०० ते ६०० रुपये दर मिळत आहे. महाराष्ट्रात यावर्षी एप्रिल पर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा पिकाचे नासाडी झाली. यावर्षी कांद्याचे २३.५ मॅट्रिक टनापर्यंत उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे कांद्याचा दर्जा कमी होईल, परंतु पावसामुळे उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही.