कूक कूक….. माधुरी दीक्षितने घेतली भेट अॅपलच्या सीईओची, घेतला वडापावचा आनंद.
Mumbai : जगप्रसिद्ध असलेल्या स्मार्टफोन कंपनीचे सीईओ टिम कूक हे मुंबईत त्यांच्या कंपनीच्या स्टोर लॉन्चसाठी आले आहेत. मुंबई भेटी दरम्यान कूक यांनी मुंबईचा फेमस असणाऱ्या वडापावचा आनंद बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सोबत घेतला.
माधुरीने या भेटीचा फोटो तिच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. माधुरीने फोटोला, ‘मुंबईत आल्यावर वडापाव पेक्षा दुसर कश्याने उत्तम स्वागत करता येऊ शकते’, असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये दोघेही वडापावचा आनंद घेताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर त्यांचा हा फोटो आता व्हायरल होताना दिसत आहे. प्रसिद्ध काॅमेडियन तन्मय ने टीम कूक आणि माधुरी यांचा हा फोटो मजेशीर कॅप्शन देऊन शेअर केला आहे.
तन्मय म्हणतो की, हे होत असताना जर कोणीच कूक कूक… गाणी गात नसेल तर मग कशालाही काहीच अर्थ नाही. त्याच्या या मजेशीर कॅप्शनला नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.