कोरोनाचा नवीन व्हेरींएट पुण्याने शोधला | या व्हेरिंएटची संसर्ग क्षमता जास्त असल्याने रुग्णसंख्या वाढीची शक्यता.
देशात परत एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढविणाऱ्या कोरोनाच्या X.B.B.1.16 या नवीन व्हेरिंएटचा शोध पुण्यात सर्वप्रथम लागला. X.B.B.1.16 या व्हेरिंएटची संसर्ग क्षमता जास्त असून, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होईल असा इशाराही पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने दिला आहे.

सध्या X.B.B.१.१६ या कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशात सध्या दररोज नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा आकडा दहा १०,००० वर गेला आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही सतत वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याच्या निदर्शनात आले आहे. मागील २० दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर या नवीन व्हेरिंटचा शोध घेणाऱ्या डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले की, ‘विषाणूं मध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.’
विषाणू मधील स्पाईक प्रोटीन मध्ये किती बदल होतात, त्यावरून त्यांची संसर्ग करण्याची क्षमता किती आहे हे निश्चित करता येते. अगदी सुरुवातीला ‘डेल्टा’ हा व्हेरिंएट घातक ठरला होता, परंतु मागील वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या ओमिक्रॉन ने त्याला मागे सारले. त्यावेळी ही रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होती. या संसर्गामुळे अनेक रुग्ण घरातच योग्य औषध उपचारांनी बरे झाले होते. उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही. आता देखील त्याचप्रमाणे एक्स.बी.बी1.16 हा व्हेरिएंट आढळून आला आहे. कोरोनाचा विषाणू सातत्याने बदलत असल्याने नवीन व्हेरिंएट शोधण्यासाठी अद्यावत अशी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.