डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

0
107

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

रामदास स्वामींनी जो लोक कल्याणाचा विचार आपल्या दासबोधातून मांडला तो आजच्या आधुनिक काळात लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांची चिरंजीव डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. रामदास स्वामींनी केलेले कार्य आपणाला अनुभवता आले नाही, त्यांना पाहता आले नाही; मात्र आज त्यांचे तेच कार्य डॉ. आप्पासाहेबांच्या रूपाने अनुभवयास मिळत आहे. 

त्यांच्या शिकवणीतून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र असे बदल घडून आले. डॉ. आप्पासाहेबांनी केलेल्या या कार्योबद्दल त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हा योग्य व्यक्तीचा सन्मान आहे. डॉ. आप्पासाहेबांना याच निमित्ताने एवढेच सांगा वाटतं की, आपण दिलेल्या शिकवणीनुसार चालायचा आम्ही प्रयत्न करू. 

हा लोकजागृतीचा प्रवास कोकणातील रेवदांड्यातून सुरू होऊन तो आज देश-विदेशात पोहोचला आहे. त्यांचे हे कार्य अपूर्व असे आहे. निस्वार्थपणे लोक कल्याणाचे कार्य करून कोणतीच अपेक्षा नसलेल्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव केलाच पाहिजे.

डॉ. आप्पासाहेब यांनी साधकांची जी चळवळ उभी केली, त्यांच्या या चळवळीतून माणसांत मूलभूत असे बदल घडून आले आहेत. त्यांच्या श्री समर्थ बैठकीतून समर्थ रामदास स्वामींनी दिलेले शिकवण त्यांनी घरोघरी पोहोचवलीे.

ह्या बैठकांमध्ये सहभागी होऊन कित्येक लोकांनी नव्याने माणुसकीचे धडे गिरवले. सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या अश्या नितीमूल्यांची चौकट बैठकांमधून लोकांच्या मनावर रुजवण्याचे काम केले जाते