तात्या विंचू आज तीस वर्षांचा झाला…
लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या सुपरहिट जोडीचा सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला’. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात मानाचे वेगळे स्थान निर्माण केले.

या सिनेमात अभिनेते महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि दिलीप प्रभावळकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. मात्र त्यातील एक महत्त्वाचे पात्र या सिनेमात होते. हे पात्र कायमचे अजरामर झाले. ते पात्र म्हणजे तात्या विंचू हा बाहुला. याच तात्या विंचू ने लहानांच्या मनात धडकी भरवली होती.
पण तुम्हाला माहित आहे का, आज तात्या विंचू ३० वर्षांचा झाला आहे. आजच्या दिवशी ‘झपाटलेला’ चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाली. हा सिनेमा 16 एप्रिल 1993 रोजी प्रदर्शित करण्यात आला. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, किशोरी आंबिये, विजय चव्हाण, मधु कांबिकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मराठी चित्रपटात पहिल्यांदाच बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग करण्यात आला होता. कलाकारां प्रमाणेच तात्या विंचू, अर्धवटराव आणि आवडी हे तीन बाहुले देखील लोकांच्या मनात कायमचे घर करून राहिले.