“दिल्ली आणि महाराष्ट्रात पंधरा दिवसातच दोन राजकीय स्फोट होतील”; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा. 

0
45

“दिल्ली आणि महाराष्ट्रात पंधरा दिवसातच दोन राजकीय स्फोट होतील”; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा. 

महाराष्ट्र : गेली काही दिवस महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी दोन मोठे दावे केले आहेत. “येत्या पंधरा दिवसांमध्ये दोन मोठे राजकीय स्फोट होणार आहेत”, असा दावा केला आहे.

भाजपमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार प्रवेश करतील अशा चर्चा होत असताना सुप्रिया सुळेंनी एक वक्तव्य केल, त्या म्हणाल्या ‘एक स्फोट दिल्ली तर दुसरा स्फोट महाराष्ट्रात होईल.’ या विधानानंतर राजकीय अटकळे लावले जात आहेत. अजित पवार कोठे आहेत? असे सुप्रिया सुळे यांना विचारले असता. त्या म्हणाल्या अजित पवारांच्या मागे मीडियाने युनिट लावले आहे. ‘अनेक समस्या राज्यात आहेत, चुकीच्या पद्धतीने राज्यात काम सुरू आहे’.

भाजपमध्ये अजित पवार प्रवेश करणार का ? यावर त्या म्हणाल्या, हे दादांनाच विचारा, मला गाॅसिप करायला वेळ नाही. माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून खूप कामे आहेत. त्यामुळे मला याचे कल्पना नाही. एक कष्ट करणारा नेता म्हणून अजित पवार सर्वांनाच आवडतात. त्यामुळे अशी विधाने केली जातात.