दिल्ली कॅपिटल्सचा सलग पाचव्यांदा पराभव | IPL 2023:RCB vs DC

0
69

दिल्ली कॅपिटल्सचा सलग पाचव्यांदा पराभव | IPL 2023:RCB vs DC

IPL Update 2023 : दिल्ली कॅपिटल्स हा हंगाम ऋषभ पंत विना खेळत आहे, दिल्लीने आतापर्यंतच्या चारही सामन्यात पराभवाचा सामना केल्यावर आरसीबी विरुद्ध तरी विजयाचे याचे खाते उघडेल अशी आशा  चहात्यांना होती.  पण दिल्लीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. 

आरसीबी ने दिल्ली समोर १७५ धावांचे आव्हान समोर ठेवले होते , मात्र दिल्लीला लक्ष गाठता आले नाही.  त्यांचा डाव २० षटकात १५१ धावा ९ बाद असा संपला. आरसीबीने २३ धावांनी त्यांचा या हंगामातील दुसरा सामना जिंकला आणि आपला दुसरा विजय नोंदवला. आरसीबी ला दिल्ली  कॅपिटल्सने १७४ धावात रोखले पण मात्र त्यांना धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली सुरूवात करता आली नाही. त्यांचे पावर प्लेमध्ये चार फलंदाज ३० धावात माघारी गेले.

यानंतर मनीष पांडे अर्ध शतक करून बाद झाला त्यानंतर अक्षर पटेलने २१ आणि अमन खानने १८ धावा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण मात्र आरसीबीच्या विजय कुमारने २० धावात ३ तर मोहम्मने २ बळी घेतले. त्यामुळे दिल्लीचा डाव संपुष्टात आला.

आजच्या सामन्यातील नाणेफेक जिंकून दिल्लीने  गोलंदाजी प्रथम करण्याचा निर्णय घेतला.  चांगली सुरुवात करून ही आरसीबीला २० षटकात ६ बाद १७४ धावाच करता आल्या.  विराट कोहली ने आरासीबी कडून सर्वाधिक ५० धावा केल्या.  दिल्लीकडून मीचेल मार्श आणि कुलदीप यादवने २  विकेट घेतल्या.