दीनानाथ मंगेशकर पुरस्कार; आशा भोसले, विद्या बालन, प्रशांत दामले, प्रसाद ओक ठरले पुरस्काराचे मानकरी
८१ वा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लता मंगेशकर स्मृती पुरस्कार हा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना तसेच इतर पुरस्कारांमध्ये मराठमोळ अभिनेता प्रसाद ओक आणि बॉलिवूड अभिनेत्री विद्यमान या कलाकारांचा देखील समावेश आहे. हा पुरस्कार सोहळा सोमवारी २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यंदाचे या पुरस्काराचे ८१ वे वर्ष आहे.

या पुरस्कारांचे मानकरी खालील प्रमाणे आहेत.
१. लता मंगेशकर स्मृती पुरस्कार – आशा भोसले
२. नाटक – प्रशांत दामले
३. संगीत पुरस्कार – पंकज उदास
४. सिनेमा – विद्या बालन
५. सिनेमा – प्रसाद ओक
६. समाजसेवा – श्री सद्गुरु सेवा संघ
७. साहित्य – ग्रंथाली प्रकाशन

हा पुरस्कार मुंबईतील पष्णमुखानंद सभागृहामध्ये सोमवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सुरुवात होणार आहे. कार्यक्रमात राहुल देशपांडे यांची गाण्याची मैफिल तसेच कथक नृत्य होणार आहे. सोहळ्याची सांगता ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्या गायनाने होईल.