प्रशांत दामले नाट्य परिषद निवडणुकीत विजयी | Naty Parishad Nivadnuk :

0
90

प्रशांत दामले नाट्य परिषद निवडणुकीत विजयी | Naty Parishad Nivadnuk :

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला एखाद्या राजकीय निवडणुकीसारखे महत्त्व प्राप्त झाले आहे. नाट्य परिषदेची निवडणूक, अखेर काल रविवारी दि. १६ एप्रिल रोजी पार पडली. मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी ५:३० पर्यंत सुरू होते. मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणी आणि फेरमोजणी ही रात्री उशिरापर्यंत चालू होती. 

मतमोजणी झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा निकाल पहाटे लागला. प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे पारडे या पंचवार्षिक निवडणुकीत जड होत त्यांचा विजय झाला. प्रशांत दामले यांच्या पॅनलचे मुंबई मध्यवर्ती शाखेतील १० जागांपैकी ८ जागांवर त्यांच्या ‘रंगकर्मी’ नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले. बाकीच्या उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले. यंदाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचेही जोरदार चर्चा रंगली होती. 

या निवडणुकीत दामले vs कांबळी अशी लढत होती. पण नाट्य परिषदेवर प्रशांत दामले यांनी आपला झेंडा रोवला. मुंबईच्या मध्यवर्ती शाखेत एकूण मतदान १३२८ इतके झाले, त्यापैकी गिरगाव येथे ८३ आणि माटुंगा यशवंत नाट्यमंदिर येथे १२४५ इतके मतदान झाले. तसेच मुंबई उपनगर शाखेमध्ये एकूण ७३० मतदान झाले. 

रंगकर्मी नाटक संघाचा ८/२ ने विजय झाला. यामध्ये प्रशांत दामले, विजय गोखले, सयाजी शिंदे, विजय केंकरे, अजित भुरे, सविता मालपेकर, सुशांत शेलार, आणि वैजयंती आपटे यांनी दणदणीत विजय मिळवला. ‘आपलं’ पॅनल यामधून दोन उर्वरित उमेदवार विजयी झाले, यात स्वतः प्रसाद कांबळी आणि सुकन्या मोने विजयी ठरल्या.