प्रशिक्षक टेन्शनमध्ये; धोनी घेणार का निवृत्ती ? सामन्या आधी धोनीने केला खुलासा..

0
63

प्रशिक्षक टेन्शनमध्ये; धोनी घेणार का निवृत्ती ? सामन्या आधी धोनीने केला खुलासा..

IPL Update : यंदाचा आयपीएलचा हंगाम महेंद्रसिंग धोनी साठी अखेरचा असणार आहे अशा चर्चा चालू आहेत. गेल्या कित्येक हंगामापासून ही चर्चा होत आहे. धोनीने यापूर्वीच वन-डे, टी-ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली होती. 

मात्र त्यानंतर आता, आयपीएलचा हंगाम धोनीचा अखेर चा असणार असे बोलले जात आहे. यावर अनेक वेळा धोनीने भाष्य केले आहे. आता त्यांने मोठे विधान केलं आहे. आयपीएल २०२३ च्या हंगामातील २४ व्या सामन्यामध्ये CSK ने रोमहर्षक सामन्यात RCB चा ८ धावांनी पराभव केला. 

कालच्या सामन्यात RCB नाणेफेक जिंकून पहील्यांदा गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. CSK ने प्रथम फलंदाजी करत २२६ धावा ठोकल्या आरसीबीने प्रत्युउत्तरात २० षटके खेळून केवळ २१८ धावाच करू शकले. 

दरम्यान एका कार्यक्रमात धोनीला निवृत्ती बद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर धोनीने मोठे विधान केले. निवृत्ती घ्यायला अजून बराच वेळ आहे. सध्या तरी आम्हांला अजून बरेच सामने खेळायचे आहेत. मी आताच काही बोललो तर कोच दबावाखाली येऊ शकतात. कालच्या सामन्या नंतर CSK संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला  आहे.