बीसीसीआयने देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमधील बक्षीसाच्या रक्कमेत केली बंपर वाढ

0
75

बीसीसीआयने देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमधील बक्षीसाच्या रक्कमेत केली बंपर वाढ

BCCI : भारतात देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धांना खूप महत्व आहे. या देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धांमधून राष्ट्रीय क्रिकेट संघाला अनेक चांगले खेळाडू मिळतात. त्यामुळे आता देशांतर्गत होत असलेल्या क्रिकेट स्पर्धांमधील जी बक्षीसांची रक्कम असते त्यात भरपूर वाढ करण्यात आली आहे. 

आज भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे सचिव जय शहा यांनी पुरुषांच्या रणजी तसेच इतर स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ केली आहे. जय शहा यांनी महिलांच्या राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा मधील बक्षिसांच्या रकमेत देखील वाढ केली आहे. बीसीसीआयच्या सचिवांनी ट्विट करत ‘राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पुरुषांच्या तसेच महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमधील बक्षीस रकमेत वाढ करत असल्याची घोषणा केली’. 

देशांतर्गत होणाऱ्या पुरुषांच्या तसेच महिलांच्या क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे. देशांतर्गत होणारी क्रिकेट मधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे ‘रणजी ट्रॉफी’ ही आहे. आता रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला ५ कोटींचे रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. तर ५० लाख रुपये बक्षीस महिलांच्या एक दिवसीय स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला मिळणार आहे. यापूर्वी महिला संघाला राष्ट्रीय स्पर्धेत जिंकल्यावर ६ लाख रुपये मिळत होते.