महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
महाराष्ट्रात लवकरच पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होणार का !!
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सतत वेगवेगळ्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरताना दिसतात. मात्र आता मिटकरी यांच्या एका नव्या दाव्याने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. त्यांच्या या दाव्याने सरकार बदलाच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील मिटकरी यांनी यावेळी केला.

तसेच मिटकरी म्हणाले, लवकरच या महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीचे महाविकास आघाडीचं सरकार पहायला दिसेल. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याच्या आधीच राज्यात नवं सरकार येणार या दाव्यामुळे सत्ताधारी आमदारांची झोप देखील चांगलीच उडाली आहे.
दरम्यान, नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. या सभेत महाविकास आघाडी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
सभेला विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थिती लावणार का ? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेल्या सभेत गैरहजर होते, मात्र नाना पटोले नागपुरात होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार आहेत.
मात्र सर्वांचे लक्ष आजच्या सभेला अजित पवार उपस्थित राहणार का याकडे लागले आहे.