‘माहेरची साडी’ नंतर तर तब्बल 32 वर्षांनी विजय कोंडके यांनी केली नवीन चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात.
विजय कोंडके निर्मित आणि दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात खूप गाजला होता. त्यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

त्यांच्या या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी तीस वर्षानंतर परत एकदा नवीन चित्रपटाची निर्मिती सुरू केली आहे. विजय कोंडके यांच्या नवीन चित्रपटाचे नाव ‘लेक असावी तर अशी’ असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ त्यांच्या कोंडके फार्मवर (इंगवली ता. भोर) शनिवारी (ता.15) शुभारंभ करण्यात आला.