मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची होणार टीम इंडियात एन्ट्री;  दिले रोहित शर्माने संकेत 

0
69

मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची होणार टीम इंडियात एन्ट्री;  दिले रोहित शर्माने संकेत 

IPL Update : सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्याच मैदानावर मुंबई इंडियन्स ने १४ धावांनी पराभव करून आपल्या विजयाची हॅट्रिक नोंदवली. कर्णधार रोहित शर्माने  या विजयानंतर मीडियाशी बोलताना भारतीय संघाबाबत भाष्य केले आहे.  

मुंबई इंडियन्स्  खेळाडू लवकरच  भारतीय संघात सहभागी होणार आहे. असा संकेत त्यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्याने तिलक वर्माचे भरपूर कौतुक केले आहे.  सनरायझर्स हैदराबादच्या विरुद्ध तिलक ने 17 चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने 37 धावांची तुफान खेळी केली.  त्यामुळे मुंबई इंडियन्स ने मोठी धावसंख्या उभी केली. 

तिलकच्या खेळीवर रोहित ही खुश आहे. रोहित ने तिला लवकरच भारतीय संघात दिसणार असल्याचे संकेत दिले. आमच्या संघात नवीन काही खेळाडू आहेत, ते यापूर्वी आयपीएल खेळले नव्हते. मला त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. असे रोहित ने म्हटले. तसेच मागील सीझनमध्ये तिलक ला खेळताना सर्वांनी पाहिले आहे. तिलक गोलंदाजी करत नाही, परंतु चेंडूला तो चांगलाच खेळवतो. 

या शब्दात तिलक वर्माचे कौतुक केले. लवकरच आम्ही त्याला इतर संघांसाठी खेळताना पाहू, असे रोहित ने विधान केले आहे.