Gas Cylinder Price Hike ! गॅस सिलेंडरच्या दरात वर्षभरात २२.५% टक्के दरवाढ, ‘सर्वसामान्य गॅसवर’  

0
41

Gas Cylinder Price Hike ! गॅस सिलेंडरच्या दरात वर्षभरात २२.५% टक्के दरवाढ, ‘सर्वसामान्य गॅसवर’  

Gas Cylinder Price Hike : कोरोनाच्या महामारी नंतर जनतेच्या समोर महागाईचे संकट पुढे उभे ठाकले आहे. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. यातच गॅस सिलेंडरचे दर ११०० रुपयांवर पोहोचल्याने मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडत आहे. 

विशेष कोरोना महामारी नंतर सिलेंडरचे दर वाढतच राहिले. गॅस सलेंडरवर मिळणारी सबसिडी ही केंद्र सरकारकडून बंद करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सिलेंडरचा खर्च परवडत नसल्याचे चित्र आहे. गेली दोन वर्षे सतत पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरच्या दरात वाढ होत असल्याने जनता मेटाकुटीला आली आहे. 

कोरोनाच्या संकटानंतर अनेकांचे आर्थिक स्थिती खालवली आहे. यामुळे दरवाढ थोडी तरी आटोक्यात येऊन थोडासा तरी दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. मात्र प्रत्यक्षात अत्यावश्यक असणारे सिलेंडर आणि इंधन दिवसागणिक महागच होत चालले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर गेल्या काही महिन्यापासून स्थिर आहेत. मात्र सिलेंडरच्या दरात वाढ होतच आहे. गेल्या मार्च २०२२ पासून ते मार्च २०२३ यादरम्यान घरगुती सिलेंडर सुमारे २२.५० टक्क्यांनी महाग झाला आहे. 

भविष्यात सिलेंडरच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई वाढत असल्याने मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसवणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी तारेवरची कसरत करण्यासारखे झाले आहे. या सततच्या वाढणाऱ्या किंमतीमुळेे ग्रामीण भागातील जनता पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे  वळत आहे.