जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगारांना मिळणार 50 हजार रुपयांचे कर्ज!!

0
60

जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगारांना मिळणार 50 हजार रुपयांचे कर्ज!!

जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या  गुन्हेगारांच्या घरी तेच एकटे कमावते असल्यामुळे, तसेच त्या व्यक्तीच्या  कुटुंबाचे पालन पोषण करण्यास कोणी नसल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. गुन्हेगारांच्या कुटुंबीयांचा काही दोष नसताना त्यांना का बर शिक्षा मिळावी?यावर काढलेला उपाय म्हणजेच जिव्हाळा योजना!! 

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील  गुन्हेगाराला 50 हजार रुपये कर्ज  जन्मठेपेची शिक्षा  सुनावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मिळतील. 

या योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळेल?

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तीने ( 60% ) साठ टक्के व्याजदराने मिळणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँके कडे  अर्ज करावा.

बँकेकडून मिळाल्या जाणाऱ्या रकमेतील (1 % )एक टक्के रक्कम ही  त्या व्यक्तीच्या कल्याण निधी मध्ये जमा केली जाते , म्हणजेच तारण जमा केले जाते.

 या व्यक्तींना कर्ज कोणत्याही गॅरेंटर शिवाय दिले जाते

दोषी व्यक्तीने कारागृह अधिकाऱ्याकडे  कर्ज मिळवण्यासाठी ची मागणी व्यक्त केल्यावर  तो अधिकारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करतो व त्या व्यक्तीच्या  नावे बँकेत अर्ज सादर करतो.

 नंतर बँकेतील अधिकारी  त्या व्यक्तीच्या कागदपत्रांची व तपशिलाची  खात्री करण्यासाठी त्याच्या कुटुंबाची भेट घेतात.

 कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर कैद्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात.

 पुण्यातील येरवडा आहे जेल टेलर काम लेदर फॅक्टरी ,  हातमाग बेकरी पावरलूम  आणि लॉन्ड्री यासारख्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे.

 यासारखे उद्योग हा दोषी व्यक्ती करून बँकेचे कर्ज परतफेड करू शकतो. म्हणून त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते