IPL 2023 : KKR टीमने आणली मोठी  Good News,  अतिशय घातक बॅट्समनची टीममध्ये एंट्री

0
88

Kolkata Knight Riders IPL 2023 :  यावर्षीच्या  IPL 2023 मध्ये KKR टीमची ताकत आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागील T20 वर्ल्ड कपमध्ये त्याने भारतीय  बॉलर्सला चांगलेच आसमान दाखवले होते .  असा हा  अतिशय  घातक बॅट्समन आता केकेआर टीमकडून खेळणार आहे.

Kolkata Knight Riders IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स टीममध्ये आयपीएल 2023 चा 13 वा सामना  खेळला गेला. आयपीएलच्या या मॅचमध्ये रिंकू सिंहच्या ऐतिहासिक इनिंगच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने विजय मिळवला.  या  मॅचच्या दरम्यानच  कोलकाता नाइट रायडर्स टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे.  ती बातमी अशी  आहे की, एक मोठा बॅट्समन आयपीएल 2023 दरम्यान कोलकाता टीममध्ये दाखल झालाय.  असा हा खेळाडू क्रिकेट विश्वात आपल्या स्फोटक बॅटिंगसाठी ओळखला जातो.

लिटन दास  हा बांग्लादेशचा स्फोटक फलंदाज आयपीएल 2023 दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स टीममध्ये  खेळण्यासाठी तयार   झालेला आहे . यापूर्वी  लिटन दास बांग्लादेशसाठी खेळत होता.   लिटन दास हा  तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये कोलकाता नाइट रायडर्स टीमचा भाग नव्हता.  ही आनंदाची बातमी कोलकाता नाइट रायडर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना लिटन दास भारतात दाखल झाल्याची दिली.

लिटन दासची  भारताविरुद्ध आक्रमक बॅटिंग

आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन कोचीमध्ये झालं. त्यावेळी कोलकाता नाइट रायडर्सने लिटन दासला 50 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं. पहिल्या फेजमध्ये लिटन दास अनसोल्ड होता. पण दुसऱ्या राऊंडमध्ये केकेआरने त्याला विकत घेतलं. लिटन दासकडे टी 20 फॉर्मेटचा अनुभव आहे. तो आक्रमक बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारताविरुद्ध त्याने आक्रमक बॅटिंग केली होती.

लिटन दासची टी20 क्रिकेटमध्ये शानदार आकडे

लिटन दास चे वय  28 वर्ष आहे. असा हा लिटन दास   आतापर्यंत एकूण 71 टी 20 इंटरनॅशनल सामने खेळलाय.  त्याच्या या  कारकिर्दीमध्ये  त्याने 23.43 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत. लिटन दास चा स्ट्राइक रेट 132.43 चा आहे. लिटन दासचे टी 20 मध्ये 10 हाफ सेंच्युरी आहेत.

अशी आहे KKR ची टीम

नीतीश राणा (कॅप्टन),, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर,जेसन रॉय सुनील नरेन, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, टिम साउदी, उमेश यादव, अनुकूल रॉय, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, रहमानुल्लाह गुरबाज, हर्षित राणा, लिटन दास, कुलवंत खेजोरोलिया, सुयश शर्मा, नारायण जगदीशन, वैभव अरोड़ा, डेविड वीजे, मनदीप सिंह.