Lpg gas cylinder price: देशांतर्गत सिलिंडर आजपासून ₹ 200 कमी किमतीत उपलब्ध होईल, या ग्राहकांना चारशे रुपयांनी स्वस्त गॅस मिळेलLPG सिलिंडरची किंमत: देशांतर्गत सिलिंडर आजपासून ₹ 200 कमी किमतीत उपलब्ध होईल, या ग्राहकांना चारशे रुपयांनी स्वस्त गॅस मिळेल.
रक्षाबंधनानिमित्त केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. महागाईपासून मोठा दिलासा देत घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरची नवीन किंमत 30 ऑगस्ट 2023 पासून देशभरात लागू झाली आहे. 33 कोटींहून अधिक ग्राहकांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी (२९ ऑगस्ट) गॅस सिलिंडरच्या दरात कपातीची माहिती दिली होती. ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व लोकांसाठी एलपीजी सिलेंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
PM ujjwala yojana उज्ज्वला योजनेंतर्गत 75 लाख महिलांना नवीन गॅस कनेक्शन,
याशिवाय उज्ज्वला योजनेंतर्गत 75 लाख महिलांना नवीन गॅस कनेक्शन देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गॅस ग्राहकांनाच दिलासा मिळणार नाही, तर उज्ज्वला लाभार्थ्यांना 400 रुपयांचा लाभ मिळणार आहे कारण उज्ज्वला योजनेंतर्गत त्यांना 200 रुपयांची सबसिडी आधीच मिळते.
आजपासून दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये होणार आहे
. या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत 30 ऑगस्टपासून lpg gas cylinder weight 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये झाली आहे. मे 2020 च्या तुलनेत सध्या एलपीजी सिलेंडरची किंमत दुप्पट आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ७०३ रुपयांना एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.
कोणत्या शहरात किती दर? Lpg Gas cylinder price today
lpg gas cylinder price delhi देशाची राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ११०३ रुपये आहे. आजच्या २०० रुपये सबसिडीच्या निर्णयानंतर ही किंमत ९०३ रुपये होईल.
कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या १,१२९ रुपये आहे. आता ती ९२९ रुपये होईल.
lpg gas cylinder price Mumbai मुंबईत सिलिंडरची सध्याची किंमत ११०२.५० रुपये आहे. दर कपातीनंतर हा किंमत ९०२.५० रुपये होईल.
चेन्नई शहरात नवीन एलपीजी सिलिंडरची किंमत १११८.५० रुपयांवरून ९१८.५० रुपयांवर येईल.
आपणास हे देखील आवडेल
३० ऑगस्टला आकाशात दिसणार ब्लू मून, जाणून घ्या काय आहे ‘सुपर ब्लू मून’
पीएम मोदींच्या सुरक्षारक्षकाने ही ब्रीफकेस सोबत का नेली? यात काय होते माहीत आहे?
चंद्रावर भारताला स्थान मिळवून देणारे ISRO नेमके आहे तरी काय ? ISRO full information in Marathi
चांद्रयान 3 ने पाठवला चंद्राचा पहिला फोटो, पहा
चांद्रयान-३ विक्रम लँडर चंद्रावर केवळ 14 दिवसच का काम करेल ?