परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना २४-८-२०२३ चे परिपत्रक

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना

निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा काल

 मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आ मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.

 

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३१.०३.२०२३ अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. या शासन निर्णयातील परि.८ मध्ये यानुषंगाने कार्यपध्दतीबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ति उपदान अनुज्ञेय करण्यासाठी याद्वारे पुढीलप्रमाणे कार्यपध्दती निश्चित करण्यात येत आहे. शासन परिपत्रक:

 

वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या कर्मचान्याच्या मृत्युपश्चात त्याचे कुटुंबाने संदर्भाधीन शासन निर्णयासोबतच्या नमुना-३ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्यानुषंगाने कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-१ प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत रुग्णता निवृत्त झालेला कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ अंतर्गत रुग्णता निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र ठरत असल्यास व सदर कर्मचाऱ्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करणे, या विकल्पाची (नमुना-३ नुसार) निवड केली असल्यास, त्यानुषंगाने रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट- २ प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

 

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत सेवेत असलेल्या कर्मचान्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन त्या सोबतच्या नमुना- २ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे रूग्णता निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास, त्यानुषंगाने रुग्णता निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-३ प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी…

 

४. वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३१.०३.२०२३ नुसार कार्यरत असणाऱ्या ज्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास किंवा तो रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास यथास्थिती त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन / त्याला रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याचा विकल्प नमुना-२ मध्ये सादर केला आहे. अशा कर्मचाऱ्याला तो सेवानिवृत्त होईपर्यंत सदरचा विकल्प बदलण्याची मुभा असेल, कर्मचाऱ्याने वेळोवेळी सादर केलेल्या विकल्पाची नोंद आहरण व संवितरण अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात तत्परतेने घ्यावी. तसेच सदर विकल्याची व त्याची नोंद घेतलेल्या सेवापुस्तकाच्या पानाची साक्षांकित सत्यप्रत अधिदान व लेखा • अधिकारी/ जिल्हा कोषागार अधिकान्यामार्फत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) यांच्याकडे अभिलेखासाठी पाठवावी. विकल्प देणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार असल्यामुळे कर्मचाऱ्याने तो हयात असताना • दिलेला विकल्प, त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.

 

५. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम १३२ मध्ये नमूद केल्यानुसार “शासनाला येणे असलेल्या रकमा प्रथमतः सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान यामधून वसुल करण्यात याव्यात.

 

६. शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती उपदानाचा प्रस्ताव सोबतच्या नमुन्यात परिपूर्ण भरुन मूळ सेवापुस्तकासह उपदानाच्या मंजूरीसाठी महालेखापाल कार्यालयास सादर करण्यात यावा. महालेखापाल कार्यालयाकडून प्रकरण मंजूर झाल्यानंतर प्रचलित पध्दतीने उपदान अदा करणेबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्याने कार्यवाही करावी. सद्य:स्थिती महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्ती लाभाची प्रकरणे वित्त विभागाच्या 

 

दि.०२.०७.२०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे महालेखापालांकडे ऑनलाईन पध्दतीने सादर केली जातात. प्रचलित कार्यपध्दतीप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती उपदानाचे प्रस्ताव ऑनलाईन कार्यपध्दतीने सादर करण्यासाठी सेवार्थ प्रणालीमध्ये आवश्यक ते फेरफार करण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, सद्य:स्थितीत प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येणारे सेवानिवृत्ती उपदानाचे प्रस्ताव महालेखापाल कार्यालयांकडे ऑफलाईन पध्दतीने सादर करावेत. तथापि, सदर शासन निर्णयास अनुसरुन मंजूर करण्यात येणारे कुटुंब निवृत्तिवेतन व मृत्यु उपदान / रुग्णता निवृत्तिवेतन व सेवानिवृत्ती उपदान याबाबतचे प्रस्ताव वित्त विभागाच्या दि.०२.०७.२०१५ च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीनेच सादर करण्यात यावेत.

 

जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफरांसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.

 

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध

 

करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०८२४१६५८२४२३०५ असा आहे. हा परिपत्रक डिजीटल साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

 

  1. परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा