पुण्यात आज गारांसह मुसळधार पाऊस | मुसळधार पावसाला झाली सुरुवात !!

0
148

पुण्यात आज गारांसह मुसळधार पाऊस | मुसळधार पावसाला झाली सुरुवात !!

15  एप्रिल 2023: 

हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाआहे . मागील काही आठवड्यापासून  मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात  मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. तसेच  अनेक भागात गारांसह मुसळधार पाऊस सुरू आहे.

 सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे झाले आहे .गेल्या तीन दिवसापासून पुण्यात देखील पाऊस सुरू आहे.

पुण्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.सध्या पुण्यामध्ये कोथरूड  भागात जोरदार वाऱ्यासह  गारांचा पाऊस सुरू झाला आहे.  कमी जास्त प्रमाणातपाऊस पडत असल्यामुळे  उष्णतेचा पारा ही वाढला आहे.

पुण्यामध्ये पुढील दोन दिवस पुण्यामध्ये येलो अलर्ट  दिला आहे.पुढील दोन दिवसात पुण्यामध्ये उष्णतेचा पारा 40° पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.वाढत्या तापमानामुळे पुणे शहरातील जनतेला हवामान खात्याने स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे,तसेच पुण्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवली आहे.

 आज  मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात  पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे