पुणे लोकसभा पोटनिवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये स्पर्धा | राष्ट्रवादी नेत्याने सांगितली त्यांची मागणी…
गिरीश बापट हे भाजपचे खासदार होते त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसने या जागेवर हक्क दाखवला आहे.
काँग्रेस मधील आमदार रवींद्र धंगेकर कसबा हे निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने ही असा दावा केला आहे. दुसऱ्या बाजूला बिनविरोध निवडणूक करण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने केली मागणी..
पुण्यामधील लोकसभेची जागा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे केली. त्यावेळी त्या अशा म्हणाल्या की कसबा मतदार संघ हा त्यांनी विधानसभेच्या वेळी काँग्रेसला दिला.
कसबा विधानसभेच्या वेळी आम्ही तुम्हाला जशी मदत केली तसेच तुम्ही लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला मदत करावी रूपाली पाटील यांनी सांगितले.कसब्यामध्ये विधानसभेवेळी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी खूप कामकाज केले आहे व विधानसभेची जागा काँग्रेसला दिलेली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला द्यावी. रूपाली पाटील यांनी अशी मागणी केली.
काँग्रेस नेते विजय वड्डे टी वार हे पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहेत असे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलले.
पुण्यामध्ये बिनविरोध निवडणूक होणार नाही. काँग्रेस सोबत राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही असे स्पष्ट करण्यात आले आहे