राम मंदिर अयोध्या | १५५  देशातील नद्यांमधून आणलेल्या पाण्याने अयोध्येत भगवान राम मंदिराला होणार जलाभिषेक!!

0
60
राम मंदिर अयोध्या
राम मंदिर अयोध्या

राम मंदिर अयोध्या 12 एप्रिल २०२३: 23 एप्रिल 2023 रोजी उत्तर  प्रदेशात होणाऱ्या  भगवान राम यांच्या मूर्तीचा भव्य जलाभिषेक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे करणार आहे.त्यामध्ये  155 देशांच्या नद्यांचे पाणी वापरण्यात येणार आहे. 

अयोध्या मध्ये  दिव्य अशा राम मंदिराचे काम  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली वेगाने सुरू आहे

राम मंदिर अयोध्या
राम मंदिर अयोध्या

अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरावर 23 एप्रिल 2023  रोजी 155 देशांच्या पवित्र नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक केला जाणार आहे.

या जलाभिषेक कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  आणि  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, देश-विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 23 एप्रिल रोजी 155 देशांतील जलपूजन संपूर्ण विधींनी अयोध्येतील मणिराम दास छावणी येथे केले जाणार आहे. नंतर हे पाणी श्रीराम मंदिराला समर्पित केले जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  आणि  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ‘जल कलश’ ची पूजा करतील.कलशमध्ये 155 देशांच्या नद्यांचे आणि  पाकिस्तानच्या रावी नदीसह  पाणी असेल.जगभरातील देशांमधून आणलेल्या जलकलशवर त्या देशांचे नावे,झेंडे, आणि नद्यांचे स्टिकर्स असतील.